मुख्य बातमी

कुवारबाव ब्राह्मण सभेत गुरुवारी टिपऱ्या, भोवत्यांचा कार्यक्रम

रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे श्रावण मासारंभ निमित्ताने टिपऱ्या व भोवत्यांचा कार्यक्रम नाचणे येथील यशवंत हरी गोखले भवनाच्या सभागृहात आयोजित केला आहे. हा कार्यक्रम येत्या गुरुवारी (ता. २४) जुलै सायंकाळी ४ वाजता आयोजित केला आहे. या वेळी विविध आणि आकर्षक दिव्यांची आरास केली जाणार आहे.

जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कोकाकोला ग्रुप (कोट, कोलधे, ता. लांजा) यांच्या वतीने टिपऱ्या आणि भोवत्यांचे बहारदार नृत्य सादर करण्यात येणार आहे. रत्नागिरीकरांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी, साळवी स्टॉप- नाचणे लिंक रोडवरील हवामान खात्यासमोर श्री. यशवंत हरी गोखले भवनात उपस्थित राहावे, असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फत करण्यात आले आहे.

कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे गोखले भवनाचे सभागृह सर्व सोयींनी युक्त, सुसज्ज तयार झाले आहे. या कार्यक्रमाला नाचणे, काजरघाटी, मिरजोळे, कुवारबाव, खेडशीतील सभेच्या सभासद, कुटुंबियांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ब्राह्मण सभेमार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!