क्रीडामुख्य बातमी

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपच्या विभागीय निवड चाचणीमध्ये खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारा वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल (१५ वर्षांखालील मुले व मुली) चॅम्पियनशिप ४ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत चीन देशातील शांग्लूओ येथे होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे खेळाडू सहभागी होण्यासाठी ऑगस्टच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्य निवड चाचणी पुणे येथे घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने विभागीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. संस्था/शाळा/महाविद्यालय/मंडळातील खेळाडूंनी या विभागीय निवड चाचणीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय शालेय खेळ महासंघामार्फत राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन २५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत पुणे जिल्ह्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी होणार आहे.

विभागीय निवड चाचणी कार्यक्रम उपस्थिती ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, सातारा निवड चाचणी होणार आहे. अधिक माहितीसाठी रवी पाटील (मो.क्र. ९१५८८२२१९४) यांना संपर्क साधावा.

निवड चाचणीसाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर झालेला असावा. १ जानेवारी २०१० पूर्वी तसेच १ जानेवारी २०१४ व त्यानंतर जन्मलेले खेळाडू चाचणीसाठी पात्र असणार नाहीत. शासकीय विभागाने वितरीत केलेला मूळ जन्मदाखला (इंग्रजी मधील) सादर करणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय चाचणीवेळी किमान सहा महिने वैधता शिल्लक असलेला भारतीय पासपोर्ट असणे अनिवार्य राहील. विभागीय चाचणीवेळी पासपोर्ट विभागाकडे तात्काळ पासपोर्ट मिळण्यासाठीचा अर्ज केल्याचा पुरावा सादर करणे अनिवार्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!