जिल्हा परिषदमध्ये आज दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) विजयसिंह जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार आदींच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेऊन दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
“आम्ही भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तिनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवबंधूमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जिवित आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू,” अशी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा देण्यात आली.



