मुख्य बातमी
खेड येथे रविवारी आदिवासी बांधवांसाठी विशेष लाभ मेळावा
महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी : आदिवासी घटकांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला गती देण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी उद्या (९ ऑगस्ट) खेड येथील पाटीदार भवन येथे सकाळी १० वाजता आदिवासी बांधव विशेष लाभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राज्याचे गृह, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थितील लाभणार आहे.
आदिवासी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने पाटीदार भवन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जि. रायगड तेजस्विनी गलांडे यांनी केले आहे.



