मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सुवर्णपदक प्रदान

आबलोली (संदेश कदम) : दापोलीतील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४३ वा दीक्षांत समारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे कृषी मंत्री ना. माणिकराव कोकाटे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला. या समारंभात शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवलीमधील सेजल शिंदे (कृषी जैवतंत्रज्ञान शाखा) व विधी राठी (अन्नतंत्रज्ञान शाखा) यांना राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेबद्दल सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

सेजल शिंदे व विधी राठी यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.bसुनितकुमार पाटील यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले. तसेच दोघींनाही पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थिनींना या दैदीप्यमान यशासाठी प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील व महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!