मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ३९१.११ मिमी पाऊस

आज दिवसभरात ४३.४५ पावसाची नोंद : संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस 

रत्नागिरी : आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली अजून आज दिवसभरात एकूण सरासरी ४३.४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३९१.११ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस संगमेश्वर (८२.३३ मिमी) तालुक्यात झाला आहे.

त्या पाठोपाठ रत्नागिरी तालुक्यात ६३.४४ मिमी, लांजा तालुक्यात ५४.६० मिमी, राजापूर तालुक्यात ४४.३७ मिमी, खेड तालुक्यात ४३.१४ मिमी, गुहागर ४२.२० मिमी, चिपळूण तालुक्यात २७.११ मिमी, दापोली तालुक्यात १८.४२ मिमी आणि मंडणगड तालुक्यात १५.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!