मुख्य बातमी

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्ज काढणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : सध्या सर्वत्र त्रासदायक ठरणाऱ्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आता पालकमंत्री उदय सामंत “ॲक्शन मोड”वर दिसत असून शहर विद्रुपीकरण करण्यामध्ये मोठा वाटा असलेली अनधिकृत व अनावश्यक असलेली होर्डिंग्स काढण्याचा निर्णय ना. उदय सामंत यांनी घेतला आहे. अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग्स ही केवळ शहरच विद्रुप करत नाहीत तर पर्यटक वा शहरातील नागरिकांना देखील त्रासदायक ठरतात. तसेच अशा होर्डिंग्समुळे मोठ्या अपघातांचा सुद्धा फार मोठा धोका संभवतो. याच्या विचार करूनच ही सूचना देण्यात आली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी डॉ. उदय सामंत यांची नियुक्ती झाल्यापासून डॉ. सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासकामांची अक्षरशः गंगा आणली असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. डॉ. सामंत यांच्याकडे उद्योग खाते असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा उद्योगाच्या बाबतीत देखील कात टाकताना दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ना. उदय सामंत यांच्या माध्यमातून कोट्यवधींची गुंतवणूक येत असून ना. उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उद्योग देखील येऊ घातलेले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या उद्योगांच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये पर्यटक देखील मोठ्या संख्येने येणार असल्याने ना. उदय सामंत पर्यटनाच्या बाबतीत देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेताना दिसत आहेत. पर्यटन वाढीसाठी ना. उदय सामंत यांनी अनेक पर्यटनस्थळे विकसित केली आहेत व काही विकसित होत आहेत.

अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग्स ही केवळ शहरच विद्रुप करत नाहीत तर पर्यटक वा शहरातील नागरिकांना देखील त्रासदायक ठरतात. तसेच अशा होर्डिंग्समुळे मोठ्या अपघातांचा सुद्धा फार मोठा धोका संभवतो. या सर्व बाबींचा विचार करून व भविष्यातील रत्नागिरी जिल्ह्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील सर्व ठिकाणची अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग काढून टाकण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!