कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत चिपळूण येथे रुग्णांची तपासणी

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कामथे उपजिल्हा रुग्णालयात काल (२९ मे) कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन उपलब्ध होऊन कर्करोग जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामथे गावच्या सरपंच सौ. हर्षदा कासार तसेच चिपळूण मधील मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये एकूण १७१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डेंटल स्क्रिनिंगचे (Oral) १०१ रुग्ण तपासण्यात आले. २ रुग्णांची बायोप्सी करण्यात आली. तसेच सर्वाइकल कॅन्सरचे (Cervical Cancer) एकूण २५ रुग्ण तपासण्यात आले. ३ रुग्णांची बायोप्सी करण्यात आली. ब्रेस्ट एक्झामिनेशन स्क्रिनिंगचे चे एकूण ४५ रुग्ण तपासण्यात आले.

या रुग्णांची तपासणी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. कांचन मदार, दंतशल्यचिकित्सक डॉ. सतीश गवळे, तसेच योगिता दंत महाविद्यालयातील ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ. के. सी. सिंग, वालावलकर रुग्णालय डेरवण येथील दंत शल्यचिकित्सक डॉ. आसावरी मोडक, स्त्रीरोग तज्ञ डॉ. इप्सिता गिरोल्ला, सर्जन डॉ. उत्कर्षा सिंग यांच्यामार्फत करण्यात आली. डॉ. लिऑन डिसुझा यांनी भूलतज्ज्ञ म्हणून कामकाज पाहिले. तसेच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील येथील डॉ. प्रसादे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरसिंह यादव देशमुख, डॉ. मयुरी वेळकोणे, डॉ. भागवत, इनचार्ज सिस्टर, अधिपरिचारीका, वर्ग ३ कर्मचारी व वर्ग ४ कर्मचारी, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कळत नकळत दिलेल्या सेवेमुळे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.


