मुख्य बातमीशैक्षणिक

कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत उत्तुंग यश

रत्नागिरी : शहरातील कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत उत्तुंग यश मिळवले असून, तब्बल १८ विद्यार्थी गुणवत्ताधारक आहेत.

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. स्टेट बोर्ड, महाराष्ट्र व सीबीएससी बोर्ड, दिल्ली यांच्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाणारी ही संपूर्ण भारतातील एकमेव परीक्षा आहे. शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ठरते. या स्पर्धा परीक्षेतील प्रश्न विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीचा विकास होतो. शहरातील ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी यावर्षीसुद्धा या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे.

 

गुणवत्ताधारक विद्यार्थी असे : गोल्ड मेडलधारक विद्यार्थी – सार्थक शैलेश देसाई – (९६ गुण, इयत्ता दुसरी), सर्वज्ञा संदीप तांबे – (९४ गुण (इयत्ता तिसरी). सिल्व्हर मेडलधारक विद्यार्थी – रजत गौरेश जोगळेकर (९२ गुण, इयत्ता तिसरी), हर्ष संतोष लोटलीकर (९२ गुण, इयत्ता तिसरी), स्वरा अभिजीत मांडवकर (९० गुण, इयत्ता तिसरी). ब्राँझ मेडलधारक विद्यार्थी- आरंभ मिलिंद सुर्वे (८५ गुण, इयत्ता पहिली), ओवी विलास जाधव (८२ गुण, इयत्ता पहिली), स्वराली साईनाथ चिकोडीकर (८० गुण, इयत्ता पहिली), श्रवण महेंद्र लोखंडे (८९ गुण इयत्ता दुसरी), पार्थ्वी श्रीराम देवळेकर (८९ गुण, इयत्ता दुसरी), अन्विता योगेश चिकोडीकर (८९ गुण, इयत्ता दुसरी), दर्शना लीलाधर कुंभार (८८ गुण इयत्ता दुसरी), स्वानंदी कमलेश सुर्वे (८६ गुण इयत्ता दुसरी), वीणा सुरेश मालगुंडकर(८६ गुण, इयत्ता तिसरी), श्लोक रणजित सुवारे (८५ गुण, इयत्ता तिसरी), देवांश प्रयाग शिरगावकर, (८२ गुण, इयत्ता तिसरी), अवनी सुबोध मांजरेकर (८२ गुण, इयत्ता तिसरी), हर्ष प्रसाद राऊत (७८ गुण, इयत्ता चौथी).

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांच्या नियोजनाखाली हणमंत ऐवळे, स्नेहा फुटक, दुर्वा भोरे, छोटीराम सूर्यवंशी, अनिल गार्डी, मनोज घाणेकर, प्रवीण मोरे, अमित वेदरे, गायत्री औघडे या शिक्षकांनी तसेच पालकांचेही मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज पाटणकर आणि मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन आणि कार्यवाह सतीश शेवडे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!