मुख्य बातमी

लांजा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ६ जून रोजी शिव राज्यभिषेक दिन

लांजा : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिव राज्यभिषेक दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. बी. गवई यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी संस्थेत स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या सोहळ्याच्या अनुषंगाने संस्थेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

६ जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिवस आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन-प्रशासन, रणनीती मधून आपल्याला खूप काही शिकायला मिळत आहे. ६ जून रोजी शिव राज्यभिषेक दिवस कार्यक्रम सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एकाच वेळी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!