मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

नगर वाचनालय राजापूरमध्ये ग्रंथ देवघेव सेवा संगणकीकृत करण्याचा शुभारंभ

राजापूर : नगर वाचनालय राजापूर या संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल चालू आहे. बदलत्या काळानुसार जलद गतीने ग्रंथालय सेवा देण्यात यावी या उद्देशाने ग्रंथालयातील ग्रंथांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून सभासदांना ग्रंथ देवघेव सुलभ व जलद गतीने व्हावी या करिता ग्रंथ देवघेव सेवा संगणकीकृत करण्याचा शुभारंभ आज गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी संस्थेचे ज्येष्ठ सभासद वाचक हितचिंतक श्री जयंत कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी कार्यवाह सर्वश्री. जयंत अभ्यंकर, सुहास ओळकर, राजेंद्र रानडे, जयेश हर्डीकर उपस्थित होते. तसेच वाचक सभासद सर्वश्री. लोकरे , जैतापकर, गवाणकर उपस्थित होते आणि वाचनालयाचे कर्मचारी ग्रंथपाल पद्मजा कारेकर, सहाय्यग्रंथपाल लोचनी साळवी, लिपीक साईशा पड्यार, सेवक अनिकेत नाडणकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!