मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
लांजा बसस्थानकासमोर बसची वृध्दाला धडक; वृध्द गंभीर जखमी

लांजा : बसस्थानकासमोरच एसटी बसची धडक बसल्याने वृद्ध गंभीर जखमी झाल्याचा घटना आज (३१ मे) दुपारी घडली.
लांजा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ घडलेल्या या घटनेत वृद्ध व्यक्तीचे दोन्ही पाय जायबंदी झाले असून, गंभीर जखमी अवस्थेत वृध्दाला उपचारासाठी तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.



