क्रीडामुख्य बातमी

पा. शं. बापट वाटद कनिष्ठ महाविद्यालयात उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरास आजपासून सुरुवात

रत्नागिरी : माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी खंडाळा अर्बन बँक पुरस्कृत क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिर २२ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विचारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे खजिनदार दिवाकर जोशी, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा. शिवाजी जगताप, पर्यवेक्षक प्रा. आनंदा पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी, खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते. या क्रीडा शिबिरात खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक संस्कार हारगुले व सागर कोळी हे उपस्थित होते. त्यांचा अध्यक्ष डॉ . विचारे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हे दोन्ही प्रशिक्षक तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. राजेश जाधव व श्रीम. पल्लवी बोरकर यांचे पूर्ण शिबिरामध्ये सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिरामध्ये खेळाडूंना डॉजबॉल , हॉलिबॉल, क्रिकेट तसेच शारीरिक फिटनेस यासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन मिळणार आहे. याप्रसंगी डॉ. राजेश जाधव यांनी आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वाने सर्व खेळाडूंना आपल्या जीवनातील खेळाचे महत्त्व पटवून दिले व त्यासाठी आवश्यक असलेली जिद्द, मेहनत व शिस्त खेळाडूच्या अंगी असायलाच हवी, असे त्यांनी सांगितले.

या संपूर्ण शिबिराचे आयोजन व नियोजन संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रीडा शिक्षक डॉ. राजेश जाधव व पल्लवी बोरकर यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर धोपट यांनी केले. तसेच या शिबिराचा लाभ परिसरातील शाळांच्या विद्यार्थी खेळाडूंनी बहुसंख्येने घ्यावा, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!