मुख्य बातमी

जप्त डिझेल टँकरचा ११ जून रोजी लिलाव

रत्नागिरी : डिझेलच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी जप्त करण्यात आलेला डिझेल टँकर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार इसेन्शिअल कमोडिटी ॲक्ट १९५५ अंतर्गत लिलाव करण्यास मंजुरी दिलेली आहे. हा लिलाव ११ जून रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत दाभोळ सागरी पोलीस ठाणे येथे होणार आहे. लिलावासाठी मालमत्तेचे मूळ मूल्यांकन प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

टाटा कंपनीच्या डिझेल टँकर वाहन क्रमांक एमएच-४६-बीएम-८४५७ (२०१९), मॉडेल टाटा एलपीटी ३५१८ सीआरई बीएस ४८X२, नोंदणीकृत भारक्षमता ३५ हजार केजीएस, अंदाजित मूल्य (बाजारभावानुसार) १४.७५ लाख रुपये, सध्या टँकर दाभोळ पोलीस ठाणे येथे ठेवण्यात आलेला आहे.

लिलाव, जशी आहे तशी स्थिती या तत्वावर करण्यात येईल. सहभागी होणाऱ्यांनी लिलावापूर्वी १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. यशस्वी बोलीदाराने लिलावास्थळी एकूण बोलीच्या २५ टक्के रक्क्म चेकद्वारे तात्काळ व उर्वरीत रक्कम चेकद्वारे सात दिवसांत भरावी लागेल. जिल्हाधिकारी यांना कोणतीही पुर्वसूचना न देता कोणतीही बोली नाकारण्याचा व लिलाव रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. सर्व सहभागिंनी वैध ओळखपत्र (पॅनकार्ड/आधारकार्ड) व दोन पासपोर्ट साईज फोटो आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी (दूरध्वनी ०२३५२-२७१२५६) ई-मेल lcb.ratna@mahapolice.gov.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!