
रत्नागिरी : कोकणच्या घाट माथ्याला जोडणाऱ्या अनुष्कुरा घाटात अपघात घडला असून एक एर्टिगा कार घाटात दीडशे फूट खाली कोसळली आहे. यात कौस्तुभ विजय कुरुप (वय ३०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अपघात आज झाला असून चालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी घाटातून खाली कोसळली असावी असा अंदाज आहे. पोलिसांना ही घटना कळताच घटनास्थळी पोलीस रवाना झाले असून बचाव कार्य सुरू आहे.

