रत्नागिरीचे युवा रंगकर्मी अमेय धोपटकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचा युवा नाट्य पुरस्कार जाही
रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी रंगभूमीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये रत्नागिरीचे सुपुत्र आणि तरुण रंगकर्मी अमेय धोपटकर यांना या वर्षीचा युवा नाट्य पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमीवरील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा बहुमान देण्यात येत आहे.
नाट्य परिषदेच्या अधिकृत शिफारस यादीनुसार, यंदाचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. याच ज्येष्ठ दिग्गजांच्या मांदियाळीत रत्नागिरीच्या अमेय धोपटकर यांनी तरुण वयात आपल्या कर्तृत्वाने स्थान मिळवले आहे.
या पुरस्कारांचे वितरण १४ जून रोजी एका विशेष सोहळ्यात करण्यात येणार आह. अमेय धोपटकर यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नाट्य परिषदचे समीर इंदुलकर यांच्यासह रत्नागिरीतील नाट्यवर्तुळातून आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

