मुख्य बातमी
भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. करणकुमार कररा यांचे कार्डियो पल्मनरी स्पेशलायझेशनमध्ये मास्टर्स

रत्नागिरी : भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. करणकुमार कररा यांनी कराड येथील कृष्णा विश्वविद्यापीठातून कार्डियो पल्मनरी (Cardiopulmonary) स्पेशलायझेशनमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून यशस्वीरित्या मास्टर्स ही पदवी पूर्ण केली आहे.

३ जून रोजी कृष्णा विश्वविद्यापीठ येथे झालेल्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे प्रमुख, प्राचार्य, तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या विशेष उपस्थितीत, वैद्यकीय क्षेत्रातील पीएच.डी., विविध स्पेशलायझेशन, डिग्री व मास्टर्स कोर्सेस पूर्ण करणाऱ्या सर्व डॉक्टर्सना सन्मानित करण्यात आले.

चिपळूण तालुक्यातील आलोरे गावचे सुपुत्र डॉ. करणकुमार कररा यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.



