मुख्य बातमी

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

रत्नागिरी : निसर्गरम्य गणपतीपुळे येथील शांत समुद्रकिनाऱ्यावर आज (४ जून) किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना वाळूमध्ये एक मृत डॉल्फिन (देवमासा) पडलेला दिसला.

दुपारी किनाऱ्यावरील शांत वातावरणात हा डॉल्फिन मृत अवस्थेत पडलेला पाहून अनेकांनी त्याच्याजवळ धाव घेतली. हा डॉल्फिन साधारण ४ फूट लांबीचा आहे. मृत डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे किंवा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

या घटनेची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि वन विभागाला कळवण्यात आली आहे. मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरून सुरक्षितपणे हटवून त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

समुद्रातील प्रदूषण, जहाजांची धडक किंवा नैसर्गिक बदलांमुळे सागरी जीवांना धोका निर्माण होत असल्याचे अनेकदा दिसून येते. या डॉल्फिनच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!