मुख्य बातमी

नगर भूमापन कार्यालयामार्फत जिवंत मिळकत पत्रिका उपक्रम

प्रत्यक्ष कार्यालयात न येता नागरिकांना घरपोच सेवा

रत्नागिरी : शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नगर भूमापन कार्यालयाकडून रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे जिवंत मिळकत पत्रिका उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मिळकत पत्रिकेवरील मयत धारकांची वारस नोंदीबाबतचे अर्ज प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वीकारण्यात आले. या अर्जावर तात्काळ कार्यवाही करून नमुना नं. ९ ची नोटीस अर्जदारांना देण्यात आली. या उपक्रमांसाठी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात न येता घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घेतला व समाधान व्यक्त केले. यावेळी नगर भूमापन अधिकारी सोनल काळे, संध्या सपकाळे, गणेश गोवेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!