मुख्य बातमी

नवनिर्माण ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९३.१५ टक्के 

विज्ञान शाखेचा निकाल ९५ टक्के, कला शाखेचा ८७.५० टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९०.७४ टक्के 

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सने यंदाच्या बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९३.१५ टक्के लागला असून विज्ञान शाखेने ९५.२३ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९०.७४ टक्के तर कला शाखेचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेत मुस्कान राजन सुर्वे हिने ८७.८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, जय सुरज शिरधनकर (८२ टक्के) द्वितीय तर लैलेश दिलीप कदम (८१) तृतीय क्रमांकावर झळकला.

वाणिज्य शाखेत विराज राजेश नलावडे (८४.५०) प्रथम, मारिया वासिम कुंबे (८०.५०) द्वितीय तर महेक इस्तियाक खान (७९.८०) हिने तृतीय क्रमांक पटकावला.

कला शाखेत सिद्धी चंद्रकांत शिवगण (६५.१७) प्रथम, शुभम बाबा अनुसरे (६१.५०) द्वितीय तर साक्षी कृष्णा बारगुडे (५९.१७) हीने तृतीय क्रमांक संपादन केला.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सिमा हेगशेट्ये, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळेे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी येथील एस.पी हेगशेट्ये महाविद्यालयात बीए, बीकॉम, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, आयटी, बीएससी हॉस्पिटॅलीटी स्टडीज हॉटेल मॅनेजमेंट, बीएमएस, बेँकीग इंशुरंन्स या मुबंई विद्यापिठाच्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले असुन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना इनहाउस कोट्यातून थेट प्रवेश घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. याचा फायदा विद्यार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य संजय गवाळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!