मुख्य बातमी
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपपरिसरातील नियमित अभ्यासक्रमांच्या प्रवेशापूर्वीची नोंदणी सुरू

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपपरिसरातील नियमित अभ्यासक्रमांच्या प्रवेशापूर्वीची नोंदणी सुरू झाली आहे.
एमएस्सी एन्व्हायरमेंटल सायन्स (कालावधी २ वर्षे), बीएस्सी हॉनर्स (एन्व्हायरमेंटल सायन्स) (कालावधी १ वर्ष), बीएस्सी हॉनर्स विथ रिसर्च (एन्व्हायरमेंटल सायन्स) (कालावधी १ वर्ष), एमएस्सी ऑरगॅनिक केमिस्ट्री (कालावधी २ वर्षे) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशापूर्वीची नोंदणी (Pre-Registration) सुरू झाली आहे.
पात्र व इच्छुक विद्यार्थी/विद्यार्थिनींनी कार्यालयाच्या ‘पी-६१, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी’ या पत्त्यावर किंवा 9881735210, 9823607517 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.



