मुख्य बातमी
पावस दखनी मोहल्ला येथे ईद-ए-मिलाद उत्साहात

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील पावस दखनी मोहल्ला येथे ईद-ए-मिलाद साजरी करण्यात आली. सकाळी ९.३० वाजता जुलूस काढण्यात आला. यामध्ये मुस्लिम बांधव सामिल झाले होते. ही मिरवणूक हजरत शेख महंमद पीर दर्गा ते काझी मोहल्ला, दखनी मोहल्ला अशी मार्गक्रमणा करत दखनी मोहल्ला मशीद येथे समाप्त झाली.
यावेळी विक्रमसिंह पाटील, पोलीस हवालदार संतोष करळकर, पोलीस काॅन्स्टेबल श्री. पोळसर, होमगार्ड श्री. भोजे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष वसिम म्हालदार, इकबाल फडनाईक, रिजवान फडनाईक, दाऊद मुजावर, अहमद फडनाईक, फैजल झारी, ईम्तीयाज झारी,महंमद बिजलीवाला यांनी परिश्रम घेतले.
(फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)



