मुख्य बातमी

काळबादेवी येथे दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी येथे दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक बसली. हा अपघात आज (१२ जून) सकाळी अपघात झाला. यामध्ये दोन्ही बसचे चालक किरकोळ जखमी झाले असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

पावसामुळे माती-चिखल रस्त्यावर येऊन निसरड्या झालेल्या रस्त्यामुळे चालकांना वळणावर अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात झालेल्या बसपैकी एक बस शहर वाहतूक विभागाची होती आणि ती रत्नागिरीच्या दिशेने येत होती. दुसरी बस गणपतीपुळ्याच्या दिशेने जात होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!