ठाकरे शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त १९ जून रोजी विविध कार्यक्रम

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १९ जून रोजी असणाऱ्या ५९ व्या वर्धापन दिनाचे नियोजन करण्यासंदर्भात आज शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने, संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (१७ जून) बैठक झाली.
शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीला तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, विभागप्रमुख किरण तोडणकर, मयुरेश पाटील, अमित खडसोडे, राजन शेट्ये, प्रशांत सुर्वे, बिपीन शिवलकर, दिलावर गोदड, बंड्या सुर्वे, साजिद पावसकर, राजेंद्र नेरकर, उपशहर संघटक सौ. उन्नती कोळेकर, राजश्री लोटणकर, स्मिता काटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त १९ जून रोजी सकाळी १० वाजता शिवसेना शाखा साळवी स्टॉप येथे छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून खाऊवाटप केले जाणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता शिवसेना नेते तथा माजी खासदार राऊत यांच्या संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाईल. माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात दुपारी ३ वाजता सत्यनारायण महापूजा, तर सायंकाळी ५ ते ६.३० वाजता भजन होईल. त्यानंतर ७.३० ते ८.३० यावेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
रत्नागिरी तालुक्यातील व शहरातील सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी नियोजित वेळेत सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

