मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

खेडमध्ये भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान आयोजित ‘नमो दांडिया’ ला सुरुवात; नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

खेड : भारतीय जनता पार्टी, खेड आणि येथील राजवैभव प्रतिष्ठान यांच्या वतीने ११ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी दिली.

खेडवासीयांच्या सहकार्याने गेल्या १९ वर्षांपासून श्री अंवाभवानी सार्वजनिक नवरात्रोत्सवाची परंपरा जपली जात आहे. यंदाच्या उत्सवात घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत देवीची प्राणप्रतिष्ठापना, राजोपचार पूजा, आरती, देवीचा गोंधळ जागर, सप्तशती पाठवाचन, विविध अभिषेक, कुमारिका पूजन आणि नवचंडी हवन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे दररोज रात्री आठ वाजता रंगणारी ‘नमो दांडिया’ स्पर्धा दांडिया स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले असून, विजयादशमीच्या दिवशी अंतिम तीन विजेत्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात दांडियाच्या तालावर थिरकण्याची संधी खेडकरांना मिळणार आहे.

२० ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त दीपोत्सव आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे, तर २१ ऑक्टोबर रोजी उत्तरपूजा आणि श्री देवीच्या विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि दांडियाच्या तालावर थिरकणारी तरुणाई, असा उत्साहपूर्ण माहोल खेडमध्ये अनुभवायला मिळणार आहे. या नवरात्रोत्सवात नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!