मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

सुमन विद्यालय टेरव या प्रशालेत प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात

चिपळूण : जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या प्रवेशोत्सवाच्या वेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ढोल ताशांच्या गजरात तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

तदनंतर स्वर्गीय रमाकांतराव मोरे सभागृहामध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेचे मुख्याध्यापक मंदार सुर्वे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले. प्रशालेतील शिक्षक अमोल टाकळे यांनी स्वागताच्या कार्यक्रमानंतर प्रशालेची २५ वर्षांची दैदिप्यमान वाटचाल यामध्ये आजी-माजी संस्थाचालकांचे, सभासदांचे योगदान तसेच पालक व ग्रामस्थांचे सहकार्य याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, त्याचबरोबर विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला.

प्रशालेतील शिक्षक नितीन पवार आणि श्री.धोंडीराम भंडगे यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुर्वे यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले. तदनंतर उपस्थित सर्वांच्या हस्ते नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली व शेवटी खाऊ वाटपाने प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!