क्रीडामुख्य बातमी

कै. अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन धुळप, तनया आंब्रे आणि राघव पाध्ये विविध गटांत विजयी

रत्नागिरी : कै. अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५ नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. विविध गटांतील खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी सादर करत रोख रक्कम व चषक मिळवले. यामध्ये आर्यन धुळप याने १७ वर्षांखालील गटात, राघव पाध्ये याने ११ वर्षांखालील गटात अपराजित राहून स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. दोन्ही स्पर्धांच्या प्रत्येक गटातून प्रथम दोन खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.

११ वर्षे वयोगट स्पर्धेचा विजेता राघव पाध्ये
१७ वर्षे वियोगट स्पर्धेचा विजेता आर्यन धुळप

या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रा. भा. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, ज्येष्ठ पत्रकार व रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य मकरंद पटवर्धन उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : १७ वर्षांखालील खुला गट : आर्यन धुळप, रुमिन वस्ता. उत्तेजनार्थ बक्षीस : अपूर्व बंडसोडे, मोहित टिकेकर, आयुष रायकर.

१७ वर्षांखालील मुली : तनया मच्छिंद्र आंब्रे, आर्या नितीन पळसुलेदेसाई. उत्तेजनार्थ बक्षीसे : खुशी सावंत, सानवी दामले, रमा कानविंदे.

११ वर्षांखालील ओपन गट : राघव पाध्ये, विहंग सावंत. उत्तेजनार्थ बक्षीस : आरव निमकर

१७ वर्षे वयोगट मुलींच्या स्पर्धेची विजेती तनया आंब्रे

या स्पर्धेद्वारे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना एक व्यासपीठ मिळाले असून, पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आयोजकांनी यशस्वी स्पर्धेसाठी सर्व खेळाडू व पालकांचे आभार मानले. या स्पर्धातून निवड झालेले खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्य निवड स्पर्धेत करणार असून पुढे होणाऱ्या राज्य निवड स्पर्धेसाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कानविंदे कुटुंबीय, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, शिर्के प्रशालेचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी पंच म्हणून काम पहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!