श्री मारुती – गणपती पिंपळपार देवस्थानतर्फे रत्नागिरीत जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : श्री मारुती – गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त रत्नागिरी येथे २७ ते २९ जून या कालावधीत महिला मंडळ हॉल, गणपती मंदिरा जवळ टिळक आळी रत्नागिरी येथे टिळक आळी शतक महोत्सव जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा या नावाने रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात आलेली आहे.
ही स्पर्धा १ पुरुष एकेरी, २ पुरुष दुहेरी, ३ महिला एकेरी, ४ व्ययस्कर गट पुरुष, ५ कुमार गट, ६ कुमारी गट ७ किशोर गट व ८ किशोरी गट अश्या आठ गटात खेळवली जाणार आहे या वर्षातील ही पहिलीच स्पर्धा आहे. त्यामुळे खेळाडूंनी २०२५-२६ या वर्षाची रजिस्टेशन फी ५० रुपये जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये व लहान गटासाठी १०० रुपये याप्रमाणे आकारली जाईल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल.
सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. मागावून कोणतीही तक्रार एकून घेतली जाणार नाही. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत याची सर्व स्पर्धकांनी नोंद घावी.
तालुका प्रतिनिधी खालील प्रमाणे
१) गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०)
२) रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३)
३) देवरूख – राहुल भस्मे (९६५७६३७६७८), श्री मोहन हजारे (९४२२०५३९४३)
४) चिपळूण – प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२ ), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५)
५) संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५)
६) लांजा – मनोज जाधव (७६२०११६७३६)
७) खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३१)
८) राजापूर – मनोज सप्रे (९४०३७६८३७६)
९) दापोली – माधव शेट्ये (९२०९७०९७९२)
या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून साई प्रकाश कानिटकर, मंदार दळवी व सागर कुलकर्णी तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून मनोहर केळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, विश्वस्त अरुण करमरकर, मंदार खेर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये यांनी केले आहे.



