मुख्य बातमी

डॉ. सागर जोगळे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार

वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा

खेड : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आणि समाजसेवा हीच खरी मानवसेवा या उदात्त भावनेतून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जयवंती क्लिनिक तसेच कार्तिकी हेल्थकेअर फाउंडेशनचे संचालक डॉ. सागर अनंत जोगळे यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कुणबी समाज उन्नती संघ, तालुका खेड व कुणबी समाजाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. सागर अनंत जोगळे यांना हा मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेताना डॉ. जोगळे यांनी वैद्यकीय व्यवसायाच्या चौकटीपलीकडे जाऊन सेवेचा वसा आणि माणुसकीचा वारसा जपला आहे. आरोग्यसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित न ठेवता ती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावी, या ध्येयाने त्यांनी विविध आरोग्यविषयक उपक्रमांना चालना दिली आहे.

कार्तिकी हेल्थकेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र तपासणी, रक्तगट तपासणी, मधुमेह तपासणी, हाडांची घनता व कॅल्शियम तपासणी, आरोग्यविषयक जनजागृती, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य उपक्रम तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या कार्यातून ग्रामीण समाजाच्या आरोग्यविषयक गरजांना संवेदनशीलपणे प्रतिसाद देण्याचे काम डॉ. जोगळे यांनी केले आहे.

‘समाज हीच आपली हित’ या सेवाभावी विचाराला कृतीची जोड देत त्यांनी आपल्या कार्यातून समाजाशी असलेले नाते अधिक दृढ केले आहे. त्याबद्दल कुणबी समाज उन्नती संघाच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!