आरोग्यमुख्य बातमी

पालीत मोफत कर्करोग तपासणी शिबिर संपन्न

रत्नागिरी : ग्रामीण रुग्णालय पाली येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष रत्नागिरी व उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिला व पुरुष कर्करोग तपासणी अभियान अंतर्गत कर्करोग मोबाईल व्हॅनद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोग सर्व तपासण्या या मोफत करण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक रवींद्र सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे यांचे महत्त्वाचे योगदान लाभले. या कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पाली डॉ. विकास कुमरे यांनी कर्करोग विषयी सविस्तर माहिती दिली. सर्वांनी कर्करोग तपासणी करून घ्यावी असे सर्वांना आवाहन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन साळुंखे यांनी सुद्धा आजाराविषयी जनजागृतीपर माहिती दिली.

या तपासणी शिबिराला दंत शल्य चिकित्सक डॉ. शुभदा बडवे, एनसीडी जिल्हा समन्वयक डॉ. यश प्रसादे, ग्रामीण रुग्णालय पालीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामअवतार मीना, डॉ. संजय श्रीखंडे, दंत शल्य चिकित्सक डॉ. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र खानूच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपशिखा, वालावलकर डेरवण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग, पाली सरपंच विठ्ठल सावंत, नाणीज सरपंच विनायक शिवगण, कशेळीचे माजी सरपंच प्रकाश परपते, प्रतिष्ठित नागरिक, तपासणीसाठी आलेल्या सर्व महिला व पुरुष, आशा सेविका, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, ग्रामीण रुग्णालय पालीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!