Uncategorized

देवदर्शनाला गेलेल्या गुहागरातील तरुणाचा लोणावळ्यात खून

दोन जण जखमी : नऊ जणांवर गुन्हा दाखल, चौघे ताब्यात, पाचजण फरार

गुहागर : एकविरा आईचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील कोंडकारुळमधील एका तरुणाचा गाडी वळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे मारहाणीत रूपांतर होऊन त्यातून स्थानिक तरुणांनी खून केल्याचा धक्कादायक प्रकार २५ मे रोजी सायंकाळी घडला आहे. या घटनेनंतर ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत चौघांना पोलिसांनी अटक आहे, तर पाचजण फरार आहेत. या हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एकाच्या उजव्या हाताला मार लागलाय तर एकाच्या डोक्याला मारहाण झाल्यामुळे टाके पडले आहेत. कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५ रा. अडुर, कोंडकारूळ, गुहागर) असे मारहाणीमध्ये मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

घटनेबाबत जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, गुहागरमधून कमलेश धोपावकर हे तांडेल आणि नाकवांसोबत लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शनासाठी गेले होते. लोणावळ्याजवळील एका फार्म हाऊसजवळ गाडी वळवत असताना त्याच फार्महाउसच्या दुसऱ्या रूममध्ये उतरलेल्या कर्जत येथील तरुणांच्या टोळक्याने त्यांच्याशी हुज्जत घालून हाणामारीला सुरुवात केली. त्यानंतर स्थानिक तरुणांच्या मदतीने कमलेश आणि त्याच्या दोन मित्रांना मारहाण करण्यात आली. यात कमलेश धोपावकर यांना रॉडने मारलेला घाव वर्मी लागला आणि यातच ते मरण पावले. अन्य दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन स्थानिक तरुणांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणातील अन्य फरार झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!