वाङ्मय विभागाच्या उद्घाटनासह कथाकथन कार्यशाळा उत्साहात

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे वाङ्मय विभाग, संस्कृतिक विभाग तसेच आंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “कथाकथन : एक गोष्ट सांगण्याची कला” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली.
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवातील सुवर्णपदक विजेत्या व गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयच्या प्रा. साक्षी संजय चाळके यांनी कथाकथनाची कला, प्रभावी सादरीकरण, आवाजातील चढ-उतार, देहबोली आणि भावाभिव्यक्ती याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याला व सर्जनशीलतेला प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमास प्र.प्राचार्या सौ. मधुरा पाटील, वाङ्मय विभाग प्रमुख व उपप्राचार्या वसुंधरा जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख ऋतुजा भोवड, आय.क्यू.ए. सी. समन्वयक विनय बावदाने हिंदी विभाग प्रमुख प्रा. प्रियांका कुंभार आणि मराठी विभाग प्रमुख प्रा. गौरी हळदवळेकर उपस्थित होते.



