मुंबई विद्यापीठाच्या प्लॉट उपक्रमाबाबत डीजीके कॉलेजमध्ये अभिमुखता कार्यक्रम

रत्नागिरी : येथील देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात प्रोग्रेसिव्ह लर्निंग अॅबिलीटी टेस्ट (प्लाट सेल) आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनुषंगाने कौशल्य मूल्यमापन उपक्रमाबाबत अभिमुखता कार्यक्रम महाविद्यालयातील नाटेकर हॉल येथे झाला.
प्लाट केंद्र समन्वयक विनय बावदाने यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षेची उद्दिष्टे, स्वरूप, महत्त्व आणि नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्लाट सेल सह समन्वयक प्रा. विनय कलमकर यांनी प्रास्ताविक केले. प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या व करिअरच्या दृष्टीने या चाचणीचे महत्त्व विशद करत शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपप्राचार्या वसुंधरा जाधव, सर्व शाखांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच कला, वाणिज्य व विज्ञान या सर्व शाखांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वराली इंदुलकर हिने केले.



