जमीर खलफे यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड

रत्नागिरी : जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात गेली ७ वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करणारी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते जमीर खलफे यांची निवड करण्यात आली.
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड बिनविरोध करण्यात आली.जमीर खलफे हे गेली ७ वर्षे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीच्या माध्यमातून विविध घटकांसाठी काम करीत आहेत, त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून सभासदांनी त्यांची निवड केली. आपणावर सोपवलेली जबाबदारी आपण निश्चितच सर्वांच्या सहकार्याने पार पाडू , आजपर्यंत करीत असलेले काम याही पुढे निरंतर सुरू ठेवू, असे सांगून माझ्यावर सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मी सर्वांचे आभार मानत आहे, असे श्री. खलफे यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष शकील गवाणकर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, सल्लागार सुहेल मुकादम, सचिव युसुफ शिरगावकर, खजिनदार सयीद मुल्ला यांनी व उपस्थित सभासदांनी जमीर खलफे यांना शुभेच्छा दिल्या.



