आरोग्यमुख्य बातमी

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ च्या तपासणीला सुरुवात 

रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या केंद्र पुरस्कृत त्रयस्थ यंत्रणेकडून गावांचे सर्वेक्षण करण्याची सुरुवात झालो आहे. यामध्ये कुटुंबस्तर आणि गावातील सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच जिल्हा आणि तालुका प्रकल्पांची (प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोबरधन, मेला गाळ व्यवस्थापन) पाहणी केली जाणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०२५ च्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी स्वच्छ सर्वेक्षणासाठी सज्ज राहून सर्वेक्षणांतर्गत जास्तीत जास्त गुण ग्रामपंचायतीला प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत विविध घटकांसाठी १००० गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये Service level Progress (SLB) २४० गुण, Direct Observation of Sanitation Status of Villages ५४० गुण, Direct Observation of Functionality of Plants १२० गुण, Citizen Feedback १०० गुण अशा प्रकारे गुणांची विगतयारी करण्यात आली आहे.

या बाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –

१. Service level Progress (२४० गुण) या मध्ये समाविष्ट बाबी पुढील प्रमाणे –

अ. SBMMIS वर ODF Plus मॉडेल Verified केलेल्या गावांची Desktop पडताळणी.

* गुणांकनाचे निकष (१०० गुण)

गावातील घरांपैकी नोंदवलेल्या SWM मालमत्तांनी व्यापलेल्या घरांचा प्रमाण (२०)

गावातील घरांपैकी नोंदवलेल्या LWM मालमत्तांनी व्यापलेल्या घरांचा प्रमाण (२०)

ODF प्लस मॉडेल गाव प्रमाणपत्रासाठी सर्व निकष पूर्ण करणारी गावे (२०)

ODF प्लस मॉडेल गाव प्रमाणपत्रासाठी सर्व निकष पूर्ण करणारी गावे (२०)

योग्य ग्रामसभा ठराव व्हिडिओ अपलोड केलेली गावे (२०)

व. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या पोर्टलवरील स्वयंमुल्याकंन अहवाल.

गुणांकनाचे निकष (१४० गुण)

जिल्हा पात्तळीवर आवश्यक मानवी संसाधनांची उपलब्धता (२०)

ब्लॉक पातळीवर आवश्यक मानवी संसाधनांची उपलब्धता (२०)

ज्या गावांनी VWSC स्थापन केलेली आहेत (२०)

प्रशिक्षित स्वच्छाग्रहिणी पोस्ट केलेल्या गावे (२०)

DTMU द्वारा १ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२५ दरम्यान आयोजित प्रशिक्षणांची संख्या (३०)

DTMU कडून १ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२५ दरम्यान प्रशिक्षित व्यक्तींची संख्या (३०)

२. Direct Observation of Sanitation Status of Villages (५४० गुण) –

यामध्ये प्रत्यक्षात क्षेत्रीयस्तरावर निरिक्षणे नोंदवली जाणार आहेत. कुटुंबस्तर सर्वेक्षण, गाव स्तरावरील (शाळा, अंगणवाडी, पंचायतघर, बाजाराची ठिकाणे, सार्वजनिक शौचालय, आरोग्य सुविधा, तीर्थक्षत्रे) स्वच्छतेच्या व्यवस्था यांची पडताळणी केली जाणार आहे. यावेळी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण च्या मार्गदर्शक सुचनेनुसार कामे झाली आहेत अथवा कसे याबाबत निरिक्षणे नोंदवली जाणार आहेत.

* क्षेत्रीय भेटी अन्वये कुटुंबांची पाहणी / पडताळणी (२४० गुण)

स्वच्छता सुविधांची स्थिती (५५)

१००% गाव हागणदारीमुक्त आहे/नाही पडताळणी बाबत (१०)

हात धुण्याच्या सुविधेची उपलब्धता (१०)

जैवविघटनशील आणि नॉन-जैवविघटनशील कचऱ्याचे सुरक्षितपणे व्यवस्थापन करणे (११५)

सांडपाणी व्यवस्थापन (५०)

* क्षेत्रीय भेटी अन्वये गावांची पाहणी / पडताळणी (२०० गुण)

सुरक्षित अन्वये मेला गाळ व्यवस्थापन (६०)

जैविकरित्या विघटित (सेंद्रिय) / अ-जैविकरित्या विघटित (अजैविक) पाण्याचे सुरक्षितपणे व्यवस्थापन (६०)

सुरक्षित सांडपाणी व्यवस्थापन (६०)

गावस्तरीय आय.ई.सी. किंवा क्षमता बांधणी उपक्रम (२०)

* क्षेत्रीय भेटी अन्यये सार्वजनिक ठिकाणची पाहणी / पडताळणी (१०० गुण)

कार्यात्मक स्वच्छता सुविधा (३०)

दृश्यमान स्वच्छता (२०)

कमीत कमी घनकचरा असणारा जागेची पाहणी (१५)

कमीत कती सांडपाणी उघड्यावर असणाऱ्या जागेची पाहणी (३५)

३. Direct Observation of Functionality of Plants (१२० गुण)- यामध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन Unit, गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प, शहरी-ग्रामीण linkage इत्यादी प्रकल्पांची कार्यात्मकता पडताळणी करण्यात येणार आहे.

* प्रकल्पांच्या निरीक्षणाची घटक तत्वे (१२०)

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिटचे (PWMU) निरीक्षण (४०)

गोबरधन प्रकल्पांचे निरीक्षण (४०)

मलमुत्र व्यवस्थापन / सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे निरीक्षण (४०)

४. Citizen Feedback (१००) – यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाशी चर्चा करुन तसेच मोबाईल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांचा स्वच्छ भारत मिशन संदर्भातील प्रतिसाद विचारात घेतला जाणार आहे.

* नागरिक अभिप्रायाचे घटक (१००)

मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे नागरिक अभिप्राय (५०)

घरगुती सर्वेक्षणाद्वारे नागरिक अभिप्राय (५०)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!