मुख्य बातमी

देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे योग दिन

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

प्रमुख मार्गदर्शिका म्हणून योगतज्ञ सौ. ऋतुजा भोवड उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना योगविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून योगा प्रात्यक्षिके आणि प्राणायाम करून घेतले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगा प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. मिथिला वाडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आकाश रणसे (तृतीय वर्ष विज्ञान) याने केले. प्रा. वैभव कीर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!