मुख्य बातमी
रत्नागिरीच्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची संभाजी नगरमध्ये पदोन्नतीने बदली

रत्नागिरी : रत्नागिरीच्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजी नगरमध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात पोलिस उपआयुक्तपदी बढतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता बुलढाणा येथील बाबुराव महामुनी रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षकपदी रुजू होणार आहेत.
जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी येथे अपर पोलीस अधीक्षकपदी मागील अडीच वर्षे कार्यभार उत्तम पद्धतीने सांभाळला होता. त्यातही बारसू प्रकल्पासह इतर बंदोबस्तात चोख कामगिरी बजावली होती. अतिशय अभ्यासू, तितक्याच शिस्तप्रिय आणि आपल्या कार्याबाबत अतिशय दक्ष अशा प्रकारच्या अधिकारी त्यांनी आपली ओळख जनसामान्यांमध्ये निर्माण केली.



