मुख्य बातमी

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत ७ जुलैपासून कल्याण संघटकांचे दौरे

रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता, वीर पिता यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कल्याण संघटक यांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. दौऱ्याच्या वेळी अभिलेख कार्यालय विषयक, पेन्शन विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. संबंधितांनी डीस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ.ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इ.सी.एच.एस. कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन इत्यादी कागदपत्रे सोबत आणावे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

चिपळूण तालुक्यामध्ये ७ जुलै, १५ जुलै, २२ जुलै व २९ जुलै २०२५ रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे दौरा आयोजित करण्यात आला आहे. मंडणगड तालुक्यात ९ जुलै रोजी भोसले प्लाझा, मंडणगड, गुहागर तालुक्यात २३ जुलै रोजी गुहागर तालुका माजी आजी सैनिक संघटना कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे, शृंगारतळी, लांजा तालुक्यात १७ जुलै रोजी प्रा. मधु दंडवते हॉल, जनता नागरी पतसंस्थेच्या वरचा मजला, राम मंदिर जवळ, लांजा येथे दौरा होणार आहे. खेड तालुक्यात १० व ११ जुलै रोजी आणि २४ व २५ जुलै रोजी सैनिक मुलांचे वसतिगृह खेड येथे दौरा आयोजित करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!