ठाकरे शिवसेनेकडून हिंदी भाषेची सक्ती करण्याऱ्या शासन निर्णयाची होळी

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली पासून हिंदी भाषेची सक्ती करण्याऱ्या महाराष्ट्र सरकारच्या शासन निर्णयाची (जीआर) होळी काल (२९ जून) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना उपनेते सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने व माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, संजय पुनसकर, जिल्हा संघटक संतोष थेराडे, लोकसभा महिला संपर्कसंघटक सौ. नेहा माने, जिल्हा महिला संघटक सौ. वेदा फडके, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, राजापूर विधानसभा क्षेत्र संघटक रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सौ. सायली पवार, रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, लांजा तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, संगमेश्वर तालुकाप्रमुख नंददीप उर्फ बंड्या बोरुकर, चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, लांजा शहरप्रमुख मोहन तोडकरी, महिला तालुका संघटक सौ. पूर्वा मुळ्ये, युवासेना उपजिल्हा अधिकारी संतोष हातणकर, संगमेश्वर युवासेना तालुका अधिकारी तेजस शिंदे, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकी, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, आजी माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.




