मुख्य बातमी

रत्नागिरीच्या आयटीआयचे देशपातळीवर झळाळते यश

अथर्व नागवेकर आणि श्रावणी चव्हाण देशात व राज्यात प्रथम

रत्नागिरी : रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी (आयटीआय) देशपातळीवर आणि महाराष्ट्रात अव्वल यश संपादन करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. येथील प्रशिक्षणार्थी अथर्व नागवेकर आणि श्रावणी चव्हाण यांनी आपापल्या ट्रेडमध्ये देश आणि राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून देदीप्यमान यश मिळवले आहे.

अथर्व नागवेकर : ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी’चा प्रशिक्षणार्थी अथर्व नागवेकर याने COPA (Computer Operator and Programming Assistant) ट्रेडमध्ये भारतात व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

श्रावणी चव्हाण : ‘राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), रत्नागिरी’ची प्रशिक्षणार्थी श्रावणी चव्हाण हिने Fruit and Vegetable Processor ट्रेडमध्ये भारतात व महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे.

मार्गदर्शक आणि संस्थांचा मोलाचा वाटा

या देदिप्यमान यशामागे प्रशिक्षणार्थींची चिकाटी आणि कठोर मेहनत, मार्गदर्शक सचिन कुलकर्णी व मीनल दळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच गट निदेशक, संबंधित संस्थांचे प्राचार्य आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.

दोन्ही प्रशिक्षणार्थींच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!