मुख्य बातमी

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. स्वप्ना करे यांची निवड

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचा २० वा पदग्रहण सोहळा २९ जून रोजी हॉटेल संगम रेसिडेन्सीच्या प्रशास्त हॉलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. रोटरी वर्ष १ जुलै २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीसाठी नवीन कार्यक्रणीची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व इंस्टॉलेशन ऑफिसर रोटेरिअन अशोक नाईक यांनी रोटेरिअन डॉ. सौ. स्वप्ना करें यांना कॉलर प्रदान करून पुढील रोटरी वर्षाची सूत्रे त्यांचेकडे सोपवली. क्लबचे सेक्रेटरी म्हणून रोटेरिअन राजेंद्र कदम तर खजिनदार म्हणून सीताराम सावंत यांची नियुक्ती करून त्यांना पिन प्रदान केली.

त्याआधी मागील वर्षीचे प्रेसिडेंट हिराकांत साळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मागील वर्षात अनेक आव्हाने आणि अडचणींचा सामना करून आपल्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा आढावा घेतला. सेक्रेटरी रोटेरिअन संदीप करे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कार्यक्रमाचा पीपीटी प्रेझेंटेशन करून सविस्तर माहिती दिली.

प्रमुख पाहुणे आणि इंस्टॉलेशन ऑफिसर रोटेरिअन श्री. नाईक यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात रोटरी ची माहिती, कार्यपद्धती आणि समाजासाठी योगदान याबाबत थोडक्यात माहिती दिली. ग्लोबल किंवा CSR ग्रांट मधून लोकोपयोगी प्रोजेक्ट्स कसे करावेत याबाबत मार्गदर्शन केले. क्लबच्या नवीन कार्यकारणी ला शुभेच्छा देऊन पुढील वर्षात भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

सोबत इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन च्या नवीन कार्यक्रमाचा पदग्रहण सोहळा रोटेरिअन श्री. नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. इनर व्हील अध्यक्षा म्हणू सौ. ऋचा गांधी, सेक्रेटरी म्हणून सौ. चौधरी तर खजिनदार म्हणून सौ. श्रद्धा सावंत यांची निवड करण्यात आली. इनर व्हील क्लबच्या पहिल्या चार्टर अध्यक्षा सौ. स्वप्ना करे यांनी त्यांच्या कामाचा आढावा घेताना मागील वर्षात घेतलेले कार्यक्रम, त्यामध्ये मेंबर्सचा मिळालेला सहभाग आणि लोकांचा लक्षणीय प्रतिसाद यासाठी सर्वांचे आभार व्यक्त करून असच प्रतिसाद यापुढेही मिळावा अशी अशा व्यक्त केली. इनर व्हीलमध्ये काम करत असताना कुटुंबीयांकडून मिळालेले सहकार्य आणि प्रोत्साहन खूप मोलाचे असल्याचे सांगून केवळ त्यामुळेच त्या यशस्वी होऊ शकल्या, अशी कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमदरम्यान नवीन रोटेरिअन्स आणि इनर व्हील मेंबर्स ना पिन प्रदान करून रोटरी आणि इनर व्हील क्लबमध्ये सामावून घेतले.

कार्यक्रमादरम्यान समाजात किंवा वैयक्तिक जीवनात ज्यांनी उत्कृष्ट काम केले आहे अशा व्यक्तींचा मान्यवारांच्या हस्ते हौरव करण्यात आला. प्रसाद देवस्थळी ज्यांनी कोकण कोस्टल हाल्फ मॅरेथॉनची रत्नागिरीत सुरवात केली आणि स्पोर्ट्स टुरिसमची नवीन संकल्पना रुजवली त्यांचा अशोक नाईक यांच्या हासे शाळा, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मत करून वकील झालेल्या पत्रकार राजन चव्हाण यांचा देखील सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात रोटरी आणि इनरव्हील क्लब मेंबर्सचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अनेक पदाधिकारी आणि वरिष्ठ रोटेरिअन्स आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लब च्या नवीन टीम ला शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी रोटरी क्लबचे श्रीकांत भुर्के यावर्षी असिटंट गव्हर्नर म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी मार्गदर्शन करताना सदैव सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!