आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमीशैक्षणिक

कोकण कृषी विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलसचिव डाॅ. संतोष सावर्डेकर यांची शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयास सदिच्छा भेट

आबलोली (संदेश कदम) : खरवते-दहिवली (ता. चिपळूण) येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाला दापोलीतील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलसचिव डाॅ. संतोष सावर्डेकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.

कुलसचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच डाॅ. संतोष सावर्डेकर यांनी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी डाॅ. संतोष सावर्डेकर यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम यांचे विशेष आभार मानत सह्याद्री परिवाराशी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा दिला. स्वर्गीय माजी खासदार गोविंदराव निकम यांच्या आशिर्वाद व पाठिंब्यावर आपले सर्व शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी दिलेला आधार व आपुलकी याला मी कधीही उतराई होवू शकत नाही. तसेच आमदार शेखर निकम यांचे सहाय्य मी विसरू शकत नाही, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी केले व येणाऱ्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयास माझे संपूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले.

या वेळी सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, महाविद्यालयाचे कृषी विभाग प्रमुख डाॅ. हरिश्चंद्र भागडे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!