मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

आबलोलीतील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थांची पायी दिंडी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली या शाळेच्या छोट्या वारकरी विद्यार्थांची विठ्ठल रखुमाईच्या वेशात, टाळ मृदुंगाच्या नादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पायी दिंडी काढण्यात आली.

यावेळी विठ्ठल, विठ्ठल हाच जयघोष दुमदमला आणि आबलोली गावाला साक्षात पांडुरंगाचे म्हणजे विठ्ठल रखुमाई आणि वारकऱ्यांचे दर्शन झाले. ही दिंडी पाहताना भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या वारकरी दिंडित शौर्य संजय राठोड याने विठ्ठलाची आणि हर्षिता नरेंद्र रहाटे हिने रखुमाईची हुबेहूब वेशभूषा केली होती.

आषाढी एकादशी निमित्ताने या शाळेतील नर्सरी, के.जी.चे विद्यार्थी तसेच पहिली ते इयत्ता नववीच्या शाळा ते आबलोली बाजारपेठेतील विठ्ठल रखुमाई मंदिर व पुन्हा शाळा अशी पायी दिंडी काढली. यावेळी विठ्ठल रखुमाईची पालखी नाचवताना विठ्ठल रखुमाईचा जयघोष दुमदमला. आबलोली बाजारपेठेत या दिडींतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणमहर्षी आणि माजी सभापती चंद्रकांत बाईत यांनी खाऊ वाटप केले आणि वारकरी दिडींतील सहभागी सर्वांना शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.

पालखी सजावट इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केली. शिक्षक दामोदर गोणबरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा गाण्याचा सराव करून घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे, शिक्षक शीतल सोनवलकर, शर्मिष्ठा साळुंखे, शमीम मुल्ला, प्रांजली शिगवण, तेजस केंबळे, दामोदर गोणबरे, आंटी निमिता धुमाळे, शर्मिला पवार आदी सर्व या दिंडीत सहभागी झाले होते. या वारकरी दिंडीला एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष सचिन बाईत, सेक्रेटरी सौ. स्नेहल बाईत यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे कोतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!