स्वामी स्वरूपानंद अध्यात्म मंदिर (रत्नागिरी) येथेे १९ जुलै रोजी वृंदा फडके यांचे व्याख्यान

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, अध्यात्म मंदिर रत्नागिरी येथे येत्या रविवारी (१९ जुलै) रोजी सायंकाळी ५.४५ ते ७.१५ यावेळेत सौ. वृंदा फडके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर ते स्वामी स्वरूपानंद गुरु परंपरा या विषयावर हे व्याख्यान होईल. सौ. वृंदा फडके यांना लहानपणापासून अध्यात्मिक आवड आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध शिवाय अनेक स्तोत्रांचा त्यांचा अभ्यास आहे. भगवद्गीता आणि वक्तृत्व यामध्ये अनेक पारितोषिके मिळाली आहेत. योगासन, सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविले आहेत. कीर्तनाची लहानपणापासून गोडी. दादर कीर्तन संस्थेतर्फे नारदीय कीर्तनाचा अभ्यास केला. महेशबुवा काणे (वालोपे) हे त्यांचे कीर्तनातील गुरु आहेत. नोकरी सांभाळून आत्तापर्यंत १३५ कीर्तने व प्रवचने झाली आहेत.
कृपया या व्याख्यानाला आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.


