महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

आमदार संजय गायकवाड यांना निलंबित करा

सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांची राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना विनंती

आबलोली (संदेश कदम) : सध्या अधिवेशन चालू असल्याने राज्यभरातील आमदार मुंबईतील आमदार निवास या ठिकाणी मुक्कामाला आहेत. काल आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास मधील कँटीनमध्ये नित्कृष्ट दर्जाचे जेवण मिळाले असल्याने कँटीन कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली आणि याचा विडिओ माध्यमामध्ये प्रसारित झाला. तो प्रकार पाहता डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी या जबर मारहाणीबाबत प्रचंड संताप व्यक्त केला व राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांना आमदार संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याची विनंती केली आहे.

नित्कृष्ट दर्जाचे जेवण मिळावे याचे समर्थन नाही परंतु अशा प्रकारे मारहाण करणे चुकीचे आहे. मारहाण करण्याऐवजी त्याबाबत फूड कमिटी किंवा अधिवेशनात बोलता आलं असतं असं मत गणेश कदम यांनी व्यक्त केले.

एक दिवस डाळ, भाजी खराब मिळाली तर आमदारांचा असा उद्रेक असेल तर मग वर्षनुवर्षं रस्ते, पाणी, धान्य, बी-बियाणे खराब मिळत आहेत, तर जनतेने काय करावे? असा प्रश्नही गणेश कदम यांनी उपस्थित केला.

फकत आमदार निवासमधेच नाही तर अंगणवाडी, शालेय पोषण आहार, शासकीय रुग्णालय सर्वच ठिकाणी उत्तम अन्न मिळावे अशी आमची इच्छा आहे असेही पत्रकारांशी बोलताना गणेश कदम यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!