जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत सन्मान चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव जैतापूर येथे २६ ते २७ जुलै या कालावधीत काझी मल्टीपर्पज हॉल, होळी जैतापूर येथे आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत सन्मान आमदार चषक या नावाने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात आलेली आहे.
ही स्पर्धा १ पुरुष एकेरी, २ पुरुष दुहेरी, ३ महिला एकेरी, ४ कुमार गट, ५ कुमारी गट ६ किशोर गट व ७ किशोरी गट अशा सात गटात खेळवली जाणार आहे. या वर्षातील ही दुसरीच स्पर्धा आहे. त्यामुळे खेळाडूंनी २०२५-२६ या वर्षाची रजिस्टेशन फी ५० रुपये जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये दुहेरीसाठी २०० रुपये व लहान गटासाठी १०० रुपये याप्रमाणे असणार आहे. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात.
स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. मागावून कोणतीही तक्रार एकून घेतली जाणार नाही. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत याची सर्व स्पर्धकांनी नोंद घावी. स्पर्धेत विजेत्यांना रोख, शिल्ड आणि सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.
तालुका प्रतिनिधी असे : गुहागर : प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी : विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख : राहुल भस्मे (९६५७६३७६७८), मोहन हजारे (९४२२०५३९४३), चिपळूण : प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर : मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा : मनोज जाधव (७६२०११६७३६), खेड : योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर : मनोज सप्रे (९४०३७६८३७६), दापोली : माधव शेट्ये (९२०९७०९७९२).
या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच साई प्रकाश कानिटकर व राज्यस्तरीय पंच सागर कुलकर्णी तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून एकनाथ पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, सचिव राकेश दांडेकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, खजिनदार सुनील करगुटकर, सहसचिव प्रसाद माजरेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये यांनी केले आहे.



