मुख्य बातमी
अग्निवीर भरती मेळाव्याचे ४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर कालावधीत पुण्यात आयोजन

रत्नागिरी : मुंबई अभियंता गट आणि केंद्र खडकी, पुणे येथे अग्निवीर (सामान्य कर्तव्य) अग्निवीर (तांत्रिक) आणि अग्निवीर (ट्रेड्समन १० वी आणि ८ वी उत्तीर्ण) आणि अग्निवीर खेळाडू (खुला श्रेणी) साठी युनिट मुख्यालय कोट्याअंतर्गत अग्निवीर भरती मेळावा आयोजित केला जात आहे. ही भरती मुख्यालय BEG आणि केंद्र, GS (क्रीडा फक्त) श्रेणीतील उमेदवारांसाठी ४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत प्रायोजित आहे.
भरतीबाबतच्या अधिक माहितीसाठी Bombay Engr Gp & Center व www.bsakirkee.org या वेबसाइटवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.



