मुख्य बातमी

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बीज भांडवल योजनेचे सोमवारी मार्गदर्शन

रत्नागिरी : जिल्ह्यात १० जुलैपासून गुरुपौर्णिमेच्या औचित्याने जागतिक युवा कौशल्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये ११ जुलै रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन मार्गदर्शन, तसेच १४ जुलै रोजी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील बीज भांडवल योजनेबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी कळविले आहे.

१५ जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री अहिरंत मॉल, एसटी स्टँड समोर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमातून नवमहिला उद्योजिकांना आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होणार असून, जिल्ह्यातील सर्व भगिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!