मुख्य बातमी

नूतन अपर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी पदभार स्वीकारला

रत्नागिरी : जिल्ह्याचे नूतन अपर पोलिस अधीक्षक म्हणून बाबुराव महामुनी यांनी सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. माजी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

पोलिस खात्यातील तीन दशके गाठणाऱ्या महामुनी यांचा प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्थेचा व्यापक अनुभव आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी चंद्रपूर, नागपूर, सातारा आणि इचलकरंजी येथे यशस्वी कारकीर्द गाजवली आहे. त्यानंतर इचलकरंजीहून बढती मिळवून बुलढाणा येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. रत्नागिरीत बदली झाल्यानंतर त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारताच जिल्ह्याच्या सामाजिक व गुन्हेगारी संदर्भातील सविस्तर माहिती घेऊन काम सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!