मुख्य बातमी

रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजे यांची जयंती साजरी

रत्नागिरी : कुणबी समाजोन्नती संघाच्या (मुंबई) येथील ग्रामीण शाखेच्या वतीने लोकनेते शामराव पेजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी रत्नागिरीत विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शिक्षण, समाजकारण आणि महिला सक्षमीकरणावर भर देणारे उपक्रम राबवण्यात आले.

प्रारंभी लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यास आणि कुणबी समाजोन्नती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील माळनाका येथे लोकतेने शामराव पेजे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यावेळी दोन्ही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी ॲड. सुजित झिमण, विवेक सावंत, रामभाऊ गराटे, नैकर गाजी, शांताराम मालप, युवा अध्यक्ष ॲड. सागर कळंबटे, महिला अध्यक्षा विनया गावडे, सौ. साक्षी रावणंग, ॲड. संदीप ढवळ, श्रीकांत मांडवकर, प्रदीप घडशी, डॉ. दिलीप नागवेकर, गजानन धनावडे, शांताराम खापरे, ॲड. अवधूत कळंबटे, शशिकांत बारगुडे, नगरसेवक गणेश भारती, सचिन गिजबिले यांच्यासह अनेक समाजबांधव, भगिनी उपस्थिती होत्या.

यानंतर जे. के. फाईल्स, रम्य नगर येथील कुणबी भवन येथे कुणबी समाजोन्नती संघाच्या रत्नागिरी तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यास आणि कुणबी समाजोन्नती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तसेच समाजातील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. कै. रामा देवजी ढेपसे मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात मुलींनी आपल्या कल्पकतेने सुंदर कलाकृती साकारल्या.

दुपारी महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘खेळ पैठणीचा‘ हा मनोरंजक कार्यक्रम पार पडला. संध्याकाळी वसतीगृहातील मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाज संघटनेच्या माध्यमातून लोकनेते शामराव पेजे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!